वासंतिक पुष्पोत्सवानिमित्त दत्त मंदिराला फुलांची आरास   

पुणे : रंगीबेरंगी फुलांनी सजलेला सभामंडप... शोभिवंत फुलांची आरास... सुवासिक फुलांनी साकारलेले विविध हार... मोगर्‍याच्या फुलांचा पोशाख आणि गुलाब, झेंडू, चाफा यांसारख्या तब्बल २५ लाख फुलांची सजावट बुधवार पेठेतील लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात ेकरण्यात आली. वासंतिक पुष्पोत्सवानिमित्त दर्श अमावस्येला करण्यात येणारी फुलांची आरास पाहण्याकरिता पुणेकरांनी मोठी गर्दी केली.
 
श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे संस्थापिका लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र बलकवडे, कार्यकारी विश्वस्त प्रताप परदेशी, खजिनदार रजनी उकरंडे, उत्सव प्रमुख सुनिल रुकारी, उत्सव उप प्रमुख अक्षय हलवाई, विश्वस्त महेंद्र पिसाळ, शिवराज कदम जहागिरदार, डॉ. पराग काळकर, युवराज गाडवे उपस्थित होते. चैत्र महिन्यातील विशेष प्रसाद म्हणून कैरीची डाळ, पन्हे वाटप करण्यात आले. हलवाई परिवारातर्फे पारंपरिक लघुरूद्र करण्यात आले. 

Related Articles